शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका अंदाजपत्रकास दिरंगाई प्रशासनाकडून काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:50 IST

सांगली : मार्च महिना उजाडला तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत अद्याप कोणतीही चर्चा दिसून येत नाही. प्रशासनाकडूनच अद्याप अंदाजपत्रकाचे काम पूर्ण झालेले नाही.

ठळक मुद्देमार्च उजाडला तरी चर्चाच नाही; जाणीवपूर्वक विलंबाचा आरोप

सांगली : मार्च महिना उजाडला तरी महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत अद्याप कोणतीही चर्चा दिसून येत नाही. प्रशासनाकडूनच अद्याप अंदाजपत्रकाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातच महापालिकेचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायी समितीकडे जाणे बंधनकारक आहे. पण याबाबत प्रशासन व आयुक्त रवींद्र खेबूडकर फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही.महापालिकेच्या प्रशासनाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यातच अंदाजपत्रक तयार करण्याची घाई सुरू असते. पण यंदा तशी घाई प्रशासकीय पातळीवर दिसून आलेली नाही. परिणामी फेब्रुवारी महिना संपून मार्च उजडला तरी अंदाजपत्रक कुठे अडले आहे, याची माहिती महापालिकेचे पदाधिकारी व स्थायी समितीला नाही. दरवर्षी सर्वच विभागप्रमुखांकडून जमा-खर्च आणि शिलकी अंदाज तसेच आगामी योजनांसाठीची शासकीय तरतूद विचारात घेतली जाते. त्याआधारे आयुक्त प्रशासकीय अंदाजाचा आराखडा निश्चित करतात. यानंतर आयुक्तांकडून जानेवारीअखेर हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करण्यात येते. स्थायी समितीचे सभापती ते स्वीकारतात आणि त्यानुसार समितीकडून अभ्यास करून अंदाजपत्रक निश्चित करण्यासाठी अवधी घेतला जातो. सभापती इतर स्थायी सदस्यांसह प्रशासनासमवेत चचेर्ने त्यात सुधारणा करतात. त्यातून किमान जमा-खर्चाच्या बाजूंमध्ये पाच-पंचवीस कोटी रुपयांची भर घालतात. त्याद्वारे सुधारित केलेले अंदाजपत्रक स्थायी सभापती किमान फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्यात पहिल्या-दुसºया आठवड्यामध्ये महासभा घेऊन महापौरांकडे सादर करतात.महापौरांसह सर्व सदस्य स्थायी समितीच्या अंदाजपत्रकावर अभ्यास करून त्यात सूचना घेतल्या जातात. त्याआधारे महापौरांकडून अंदाजपत्रक निश्चित केले जाते. ते अंतिम करून त्याची अंमलबजावणी किमान एप्रिलपूर्वी सुरू होते. परंतु मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप प्रशासनाचे अंदाजपत्रक निश्चित नाही. त्यामुळे या अंदाजपत्रकाचा विद्यमान नगरसेवकांना लाभ मिळण्याची शक्यता कमी दिसू लागली आहे.निधीला कात्री शक्यदरवर्षी महापालिकेचे प्रशासन अंदाजपत्रकातून कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असते. गेल्यावषीर्ही प्रशासनाकडून साडेपाचशे कोटींपेक्षा अधिक अंदाजपत्रक केले होते. पुढे स्थायी समितीने ते ६०३ कोटींवर, तर महासभेने ते वाढवून ६५४ कोटींवर नेले होते. आता मात्र प्रशासनाने वस्तुनिष्ठतेसाठी अंदाजपत्रकातील तरतुदींना ७० ते ८० कोटी रुपयांची कात्री लावली जाणार असल्याचे समजते.विद्यमान सदस्यांची कोंडीमहापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून, अंदाजपत्रकाला विलंब झाल्यास विद्यमान नगरसेवकांना त्याचा लाभ मिळणार नाही. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अंदाजपत्रकास विलंब लावला जात असल्याचा आरोपही नगरसेवकांतून केला जात आहे.